कठीण प्रसंगावर मात करून यशस्वी व्हा :- तहसिलदार एफ.आर.शेख
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी : व्हॉईस ऑफ मीडिया शाखा बार्शीच्या वतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी, बार्शी येथे करण्यात आले होते.
![](https://i0.wp.com/starmazanews.com/wp-content/uploads/2024/06/img-20240622-wa00382309394086798711645.jpg?resize=800%2C560&ssl=1)
कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार एफ.आर.शेख तर प्रमुख उपस्थितीत माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, व्हॉईस ऑफ मीडिया सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोळे, ज्येष्ठ पत्रकार अरुण बळप, संतोष सूर्यवंशी, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद, कामगार नेते अजित कांबळे, विक्रमसिंह पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/starmazanews.com/wp-content/uploads/2024/06/img-20240622-wa0049281295332426551464010461.jpg?resize=800%2C480&ssl=1)
यावेळी दहावी, बारावी, शिष्यवृत्ती यामध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
![](https://i0.wp.com/starmazanews.com/wp-content/uploads/2024/06/img-20240622-wa0050281296290673601243508754.jpg?resize=800%2C489&ssl=1)
पत्रकारांना पक्की घरे, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य, पत्रकारांचे स्किल डेव्हलपमेंट व त्यांच्या अडचणी सोडविण्याचे कार्य व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून करत असल्याचे शहराध्यक्ष हर्षद लोहार यांनी प्रास्ताविकातून सांगितले.
![](https://i0.wp.com/starmazanews.com/wp-content/uploads/2024/06/img-20240622-wa00805679604357864899602.jpg?resize=800%2C565&ssl=1)
उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, संदिप आलाट, सुनील अवघडे, अनिता भोसले, संतोष सूर्यवंशी, शब्बीर वस्ताद यांनी मनोगते व्यक्त केली.
![](https://i0.wp.com/starmazanews.com/wp-content/uploads/2024/06/img-20240622-wa00477421580554355565348.jpg?resize=300%2C204&ssl=1)
यावेळी कु.पुजा संतोष सूर्यवंशी, कु.आदित्य गणेश भोळे, कु.रविराज नितीन भोसले, कु.सारंग सुनील अवघडे, कु.चाणक्य संदीप अलाट, कु.ओम रवींद्र माढेकर, कु.सक्षम शाम थोरात, कु.रिया सचिन आजबे, हुमेरा रियाज पठाण, कैफ रियाज पठाण, कु.ओंकार समाधान चव्हाण, आहील अमीन गोरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
![](https://i0.wp.com/starmazanews.com/wp-content/uploads/2024/06/img-20240622-wa00325585313923369671416.jpg?resize=800%2C505&ssl=1)
तसेच शालेय साहित्यांचे किट विद्यार्थ्यांना देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष विजय शिंगाडे, खजिनदार प्रविण पावले, शाम थोरात, निलेश झिंगाडे, समाधान चव्हाण, विक्रांत पवार, अमीन गोरे, श्रीशैल्य माळी, संगीता पवार, उमेश देशमाने यांनी परिश्रम घेतले.
![](https://i0.wp.com/starmazanews.com/wp-content/uploads/2024/06/img-20240622-wa0052326425252552266470.jpg?resize=800%2C525&ssl=1)
सूत्रसंचालन गणेश शिंदे तर आभार निलेश झिंगाडे यांनी मानले.
![starmazanews](https://secure.gravatar.com/avatar/4fda7f8e27869db8a392615e0d2c6001?s=96&r=g&d=https://starmazanews.com/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.