रा गे शिंदे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने/शहाजी चंदनशिवे
परांडा दि . 26 जून 2024 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचालित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली. सांस्कृतिक विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे डॉ संतोष काळे डॉ अक्षय घुमरे डॉ सचिन साबळे  कनिष्ठ विभागाचे सह शिक्षक प्रा शंकर अंकुश  प्रा संभाजी धनवे  प्रा दीपक हुके  प्रा रामेश्वर गायकवाड प्रा प्रकाश भालेराव  प्रा संतोष भिसे शिक्षकेतर कर्मचारी अनिल जानराव भागवत दडमल दत्ता आतकर हनुमंत मार्तंडे उत्तम माने यांच्यासह अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर  प्रा दीपक हुके यांनी आभार मानले .

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!