गोळीबार प्रकरणातील दुसरा अरोपी गजाआड            

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने .                                               परंडा दिनांक 27जून  परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारातील  वाळु बेल्ट गोळी बार प्रकरणी फरार अरोपीपैकी अन्य एक अरोपीस गजाआड करण्यास पोलिसांना यश आले अरोपी विजय शेलार यास बुधवार दिनांक २६ रोजी अटक करून परंडा न्यायालयात हजर केले आसता त्यास चार दिवस पोलिस कस्टडी देण्यात आली  परंडा तालुक्यातील भोत्रा शिवरातील पैशाच्या मागणीतून एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता अन्य एकाला डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले होते  या प्रकरणात एकूण सहापेक्षा जास्त अरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता सहा अरोपी मधील निखील गोळे यास दोन दिवसा पूर्वी अटक करण्यात आली होती यानंतर अरोपी विजय शेलार वय  20 वर्ष  याला बुधवार दिनांक २६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरातून पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले अरोपी शेलार न्यायालयासमोर हजर केले आसता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनवण्यात आली आहे तर या प्रकरणात चैतन्य शेळके , सुजित पवार ‘ किरण गोफणे इतर अरोपी अद्याप फरार आहेत.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!