शैक्षणिक परिघामध्ये वृंदावन फाउंडेशन चे काम प्रेरणादायी-कसबे

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा (27 जून)

परंडा पासून वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या छोट्याशा गावामध्ये वृंदावन फाउंडेशन व रोह कल विकास पंचायत यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात शाहीर आसारामजी कसबे, पुणे , व विकासराव कुलकर्णी ,मार्गदर्शक कल्याण सागर समूह, परांडा, वृंदावन फाउंडेशनचे संस्थापक सचिन जी पाटील , महारुद्र जाधव रोहकल विकास मंच या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित होते.
शाळा ही सुदृढ समाज व देशाला प्रगतशील बनवण्याचे साधन आहे, तसेच प्रत्येक शाळेमध्ये सामाजिक पालकत्व स्वयंप्रेरणेने नागरिकांनी घेऊन प्रत्येक महिन्यासाठी शिक्षणप्रेमी नागरिकांनी पालक म्हणून शाळेमध्ये जाऊन भेट द्यावी व शाळेच्या अडचणी व विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात.
वास्तववादी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या अडचणी समजून त्याच्यावर मात करण्यात यावी तसेच प्रत्येक गावाचा शैक्षणिक सातबारा करण्यात तयार करण्यात यावा. असे प्रतिपादन माननीय आसारामजी कसबे यांनी केले.
आजही खेड्यामध्ये मूलभूत शिक्षणापासून बरीच मुले वंचित असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सदर शाळाते जिल्हा परिषद यांच्या वतीने पहिली ते पाचवी पर्यंत असून शाळा चालू होऊन  12/ 13 दिवस झाले असताना विद्यार्थ्याला त्यांच्या आवडीप्रमाणे चित्र काढण्यात यावीत म्हणून वृंदावन फाउंडेशन च्या वतीने चित्रकला कीट देण्यात आले यामध्ये पेस्टल खडू चित्रकला वही ,खोडरबर ,शार्पनर ,पेन्सिल असे साहित्य देण्यात आले शाळेमध्ये विद्यार्थीही गुणवत्तापूर्ण आहेत. पालकांनी आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये न पाठवता मराठी शाळेतच घालावी, माझेही शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेले आहे सदर शाळा गुणवत्ता व दर्जेदार शिक्षण देत आहे त्यामुळे पालकांनी इंग्रजी शाळेचा मोह सोडावा अशी प्रतिपादन विकास कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमासाठी बाळासाहेब वाघ ,सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समिती,ग्राम पंचायत सदस्य  गणेश कोलते ,बाबासाहेब शेख ,सुग्रीव गव्हाणे
कल्याणराव पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक खैरे गुरुजी, शेख मॅडम, तांबे मॅडम ,नकाते मॅडम यांनी उपस्थित गावकरी व मान्यवरांचे आभार मानले.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!