परंडा, वाळू काढण्याच्या कारणावरून भोत्रा येथे दोन गटात गोळीबार झाल्याची गंभीर घटना.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा तालुक्यात वाळू वरून अनेकदा जेवेघेण्या घटना घडल्या आहेत त्याचीच पुनरावृत्ती भोत्रा येथे दोन गटात झाली. वाळू  काढण्याच्या कारणावरून यावेळी दोन गटात  गोळीबार गोळीबार झाल्याची गंभीर घटना घडली असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे  या  गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाले आहे.
     परंडा पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारात आज (शनिवार) वाळु व्यावसायिकांच्या दोन गटात राडा झाला. यावेळी गोळीबार देखील झाला. योगेश हनुमंत बुरंगे याच्या कमरेला गाेळी लागली. त्यामुळे याेगेश गंभीर जखमी झाला.
याेगेश यास बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या राड्यात कपील आजिनाथ अलबत्ते यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते देखील जखमी झाले आहेत. या घटनेतील अज्ञात आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!