कुर्डुवाडी रोड इंगळे प्लॉट येथे सिव्हिल इंजिनिअरर्स असो चे अध्यक्ष मुख्तार शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण.

Picture of starmazanews

starmazanews

बार्शी कुर्डुवाडी रोड इंगळे प्लॉटमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम!


बार्शी प्रतिनिधी दिनांक 19जून 2024        
बार्शी  कुर्डुवाडी रोड इंगळे प्लॉट येथे सिव्हिल इंजिनिअरर्स असोशियेशनच्या अध्यक्ष मुख्तार शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
वृक्षारोपणासाठी नगरपालिका मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्याकडून नगरपालिकेच्या रोवटिकेतून रोपे पुरवण्यात आली.

कार्यक्रमात बार्शी इंगळे प्लॉटमध्ये अनेक वृक्षांची रोपटी लावण्यात आली. सिव्हिल इंजिनिअरर्स
असोशियेशन आणि नगरपलिकेच्या सहर्याने हा कार्यक्रम  करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचा उद्देश पर्यावरणाचे रक्षण आणि वृक्षसंवर्धन करण्याची जागरूकता निर्माण करणे हा होता.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सिव्हिल इंजिनिअर व नागरिकांनीही  वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला.  नगरपालिका मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्याकडून वृक्षारोपणासाठी रोपे पुरावल्यामुळे  असोशियेशनच्या वसिव्हिल इंजिनिअरर्स तीने त्यांचे आभार मानण्यात आले.

वाढत्या शहरीकरणामुळे हिरवीगार जागा कमी होत आहेत. अशा परिस्थितीत वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.
वृक्षे हवा शुद्ध करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करतात.
वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचे रक्षण आणि वृक्षसंवर्धन याबद्दल जागरूकता निर्माण होते.

बार्शी इंगळे प्लॉटमध्ये आयोजित करण्यात आलेला वृक्षारोपण कार्यक्रम हा एक चांगला उपक्रम होता. या कार्यक्रमामुळे पर्यावरणाचे रक्षण आणि वृक्षसंवर्धन याबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी इंजिनियर आय्याज शेख,इंजिनियर सलमान आतार, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!