एस.टी आगार परंडा येथे हिरवांकुर महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

दिनांक २३/०६/२०२४ रोजी एस.टी आगार परंडा येथे हिरवांकुर महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. सत्यवान -सावित्रीच्या दृष्टांताने पवित्र पावन झालेल्या वटपौर्णिमा सणाच्या निमित्ताने स्ञी शिक्षणाची जनक असलेल्या सावित्रीबाईंच्या लेकिनी वृक्षारोपण करून समाजाला दिशा देण्याचे काम केले. आगार प्रमुख श्री उल्हासजी शिनगारे साहेब यांच्या संकल्पनेतून बसस्थानकात निर्माण झालेल्या सुंदर बगीचाच्या धर्तीवर आगारात नारळ,वड, पिंपळ या बरोबर विविध प्रकारच्या फुलांची शोभेचे रोप लागवड केली. या वेळी परंडा आगारातील सहा.वाह. निरिक्षक श्री.गो.अ.खराटे साहेब, वाहतूक नियंत्रक श्री अ.अ. हुसेनीसाहेब, सर्व चालक वाहक यांञीक कर्मचारी उपस्थित होते. जेष्ठ समाजसेवक श्री भारत काका घोगरे, श्री शिंदे सर , गायनाचार्य श्री खंडागळे सर यांनी मनोगत व्यक्त केले .वृक्ष लागवडीचा वसा घेऊन अहोरात्र वृक्षारोपण करण्यासाठी मेहनत घेणारे श्री बल्लाळ सर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आगाराच्या वतीने खराटेसाहेब यांनी *हिरवांकुर* महिला मंडळाच्या भगिनींचे व उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!