परंडा तालुक्यातील आसू,लोणी येथे जेष्ठ नागरिकांना आधाराच्या काठीचे वाटप.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परांडा – डॉ.राहुल भिमराव घुले यांच्या वतीने तालुक्यातील आसू व लोणी येथे रविवार दि.२३ रोजी १३५ जेष्ठ नागरिकांना मोफत आधाराच्या काठीचे वाटप करण्यात आले. मागील तीन महिन्यांपासून डॉ.राहुल भिमराव घुले मित्र परिवाराच्या माध्यमातून भूम परांडा वाशी तालुक्यातील जेष्ठ नागरिकांना मोफत आधाराच्या काठ्यांचे वाटप करण्यात येत असून आजतागायत तीनही तालुक्यात तब्बल पाच ते सात हजार काठ्यांचे मोफत वाटप करण्यात आले असून प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबातील वयोवृद्धांना मोफत काठ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.यावेळी आसू आणि लोणी येथील ग्रामस्थांनी डॉ.राहुल भिमराव घुले यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्व सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. यावेळी आसू गावचे पोलीस पाटील महावीर इथापे,लोणी सर्कल सोशियल मीडिया प्रमुख आनंद वायकुळे, सुखदेव टोनपे,उत्तम शिंदे ,रविराज शिंदे,मीनाक्षी काळे,मैनुद्दीन शेख,मुर्तुज सय्यद,डाॅ हसन सय्यद,सुरज बांगर,गायत्री चोबे यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!