राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सामाजीक न्यय विभाच्या वतीने गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा [ दि. २१ जून ] परंडा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्याना तात्काळ गणवेश वाटप करा आशी मागणी मा.आ.राहूल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजीक न्ययविभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे दि२१जून रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर साहेब यांनी एक राज्य एक गणवेश जाहीर केल्या प्रमाणे शिक्षण विभाग यांनी एक शासन निर्णय जाहीर केला.त्याची आमलबजावणी होताना दिसत नाही.शाळा सुरू होऊन आठवडा होऊन गेला मात्र विद्यार्थी, विद्यार्थीनीना अद्याप गणवेश वाटप करण्यात आले नाहीत त्यामुळे पालक वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी,विद्यार्थीनीना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.या सोबतच गणवेशाचे विद्यार्थी,विद्यार्थीनीना व पालकांना वाटप होईल आशी अपेक्षा होती मात्र त्यांची अपेक्षा फोल ठरली आहे.
या महिना अखेर पर्यंत विद्यार्थ्याना गणवेश वाटप न झाल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गट शिक्षण कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात येयील या आंदोलनाची जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्यय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे,जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे,तालुका अध्यक्ष विक्रम जाधव,तालुका कार्याध्यक्ष रंगनाथ ओहाळ,तालुका उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खय्युंम तुटके, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अल्पसंख्याकचे गनी भाई हावरे, खानापूर ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत परीहार,असु ग्रामपंचायतीचे ग्रा.पं.सदस्य श्रावण गणगे,ग्रां.पं.सदस्य महादेव मारकड,विजय काळे,भाग्यवंत परिहार,रामा भोसले,संजय यशवद ,गणेश चव्हाण,नामदेव काळे आदी उपस्थित होते.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.