रा गे शिंदे महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण 2020 चर्चासत्र संपन्न

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने//शहाजी चंदनशिवे
परांडा प्रतिनिधी …
परांडा.दि.18 जून 2024 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा आनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या संदर्भात एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स इन इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ एनई पी 2020 या महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव तर नवीन शैक्षणिक धोरण या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता  यांची उपस्थिती होती. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव  संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये स्कीम ऑफ मार्किंग परीक्षेमधील अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा यासंदर्भात तसेच अभ्यासक्रमा संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर चर्चासत्र महाविद्यालयातील आयक्यूएसी चे चेअरमन डॉ महेश कुमार माने बी होक विभागाचे समन्वयक डॉ संतोष काळे गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ अक्षय घुमरे प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी सहकार्य केले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या अनेक महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला होता. अनेक प्राध्यापकांनी आपल्या समस्या या ठिकाणी नोंदवल्या व त्या समस्याच निरासन या चर्चासत्रामध्ये करण्यात आले.
     चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले  डॉ विद्याधर नलवडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर शेवटी डॉ अक्षय भुमरे यांनी चर्चासत्राचे आभार मानले.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!