२लाखा ऐवजी १०लाख कर्ज द्या, आ.राजेंद्र राऊत यांचे सो.जि.म.सह. बँकेच्या प्रशासकांना पत्र.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


बार्शी प्रतिनिधी दि १७ जून २०२४.               कै. आण्णासाहेब पाटील महामंडळ तर्फे दिले जाणारे कर्ज सोलापूर जिल्हा सहकारी बँकेकडुन र.रु २ लाख ऐवजी र.रु १० लाख पर्यंत कर्ज वाटप मंजूर व्हावे यासाठी आ राजेंद्र राऊत यांनी प्रशासकांना पत्र पाठवून विनंती केली.
कै. आण्णासाहेब पाटील महामंडळ तर्फे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून र.रु २ लाख कर्ज वाटपास दिलेली मंजूरी आहे. परंतु र.रु २ लाख ही रक्कम अत्यंत कमी होत असुन सध्या मराठा समाजातील बेकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मराठा युवकांना चांगला उद्योग करता यावा या करीता सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून र.रु २ लाख ऐवजी र.रु १० लाख कर्ज मिळणेकामी मंजूरी द्यावी, अशी  विनंती करण्यात आली.


starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!