डॉ शहाजी चंदनशिवे यांचा शैक्षणिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा.

Picture of starmazanews

starmazanews


(गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची दहा हजार रुपयाची पुस्तके वाटप .महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला वाढदिवस )

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

परंडा
दि .15 जून 2024 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक तथा समाजसेवक डॉ शहाजी चंदनशिवे यांचा शैक्षणिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला . सालाबादप्रमाणे डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त परंडा शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तक देऊन तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत आपला वाढदिवस साजरा केला . शहरातील क्रांती अकॅडमी मध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला .तसेच शहरातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोहन दादा बनसोडे धनंजय सोनटक्के किरण बनसोडे यांनीही डॉ शहाजी चंदनशिवे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला . शहरातील अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना १०,००० किंमतीची स्पर्धा परिक्षेची पुस्तके विविध मान्यवरांच्या हस्ते देऊन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी अकॅडमी चे संस्थापक कोकणे सर फिजिकल ट्रेनर दीपक ओव्हाळ तसेच शहरातील ज्येष्ठ समाजसेवक तानाजी शिंदे सर्वगोड लोकरे श्री डांगे यांच्यासह डॉ शहाजी चंदनशिवे यांचे आई वडील पत्नी मुले व सर्व कुटुंबासह अनेक मान्यवर उपस्थित होते .


डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की परंडा शहरामध्ये स्पर्धा परीक्षेचे वातावरण निर्माण व्हावे व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठे मोठया पदावर जाऊन अधिकारी व्हावे हा उद्देश समोर ठेवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी त्यांना ही पुस्तके देत आहे . तेव्हा विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्या जीवनात यश संपादन करावे .
यावेळी दीपक ओव्हाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन करत आभार मानले .

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!