विद्येच्या प्रांगणात
मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर निगडी येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात शुभ आगमन.

Picture of starmazanews

starmazanews


ज्ञान मंदिर हे ज्ञानाचे आज किलबिलाटाने नटले निर्जिव भिंतींना या जणू त्यांचे श्वास येऊन भेटले.




स्टार माझा न्यूज पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- शनिवार दिनांक १५/०६/२०२४ रोजी मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर, यमुनानगर, निगडी येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे सनईच्या सुरात, ढोल ताश्याच्या गजरात,मोठ्या आनंदी व उत्साहाच्या वातावरणात औक्षण करून गुलाबपुष्प,पेन्सिल व पेढे देऊन स्वागत करण्यात आले.
उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्ट्यांचा आनंद घेऊन सर्व विद्यार्थी पुन्हा नव्या दमाने शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत आले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह ओसंडुन वाहत होता. त्यात भर पडली ती नाविन्यपूर्ण अशा कच्ची घोडा या नृत्याची. राजस्थानी कलाकार सुरज व पियूष यांनी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या तालावर ठेका धरून कच्ची घोडा हे पारंपरिक नृत्य सादर केले. त्यात मुले,पालक व शिक्षक यांनी देखील सहभागी होऊन जल्लोष साजरा केला.
        शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री.मानसिंग साळुंखे,  प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग मराडे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.तुषार कुटे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा मा.सौ.वर्षा आजरेकर, माता पालक संघाच्या सदस्या सौ.अश्विनी पाटील,सौ.सुनिता ढाकने, सौ.उर्मिला आवारे,सौ.मधुरा मोरे,सौ.तेजश्री ठोंबरे,सौ.प्रिया जंगम,सौ.दिव्या साळवी, सौ.शारदा हागे,सौ.कविता सावंत व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
       प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पांडुरंग मराडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले.मा.श्री.मानसिंग साळुंखे,यांनी सर्व विद्यार्थी,पालक व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थी प्रवेश शुभारंभ सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री.किरण वारके यांनी केले.संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्रा.डॉ.गजानन एकबोटे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!