जरांगे पाटील यांच्या आंदोलनास माजी आ.मोटे यांचा पाठींबा.

Picture of starmazanews

starmazanews

अंतरवाली सराटी उपोषणाला मोटे यांची भेट


स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा : सगेसोयऱ्यांसह कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा आदेश काढून त्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गुरुवार (दि. १३ ) उपोषणाच्या सहाव्या दिवशी परंडा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राहूल मोटे यांनी श्री जरांगे पाटील यांची भेट घेऊन संवाद साधला व परंडा – भूम – वाशी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जाहिर पाठिंबा दिला . यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते . श्री मोटे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि ,मराठा समाज पुर्वीपासून आरक्षणापासून वंचित असल्यामुळे मराठा समाजातील तरूण-तरूणींना प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. मराठा समाजाला आरक्षणाची असलेली गरज व मराठा आरक्षण बाबतची सकल मराठा समाजाची तीव्र भावना लक्षात घेऊन समस्त मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सरकारने मराठा आरक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.तसेच मराठा समाज बांधवांला ओ.बी.सी. मध्ये कुणबी मराठा, सगे सोयरे या शब्दाचा आंतरभाव करून लाभ मिळण्यासाठी मी आंतरवली सराठी येथे उपोषणाला बसलेले मराठा समाज आरक्षणाचे जनक व प्रणेते श्री मनोज (दादा) जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास माझा पूर्ण पाठिंबा असून माझ्यासह मी परांडा भूम वाशी विधानसभा मतदार संघाचे वतीने जाहीर पाठिंबा देत आहे. असे श्री मोटे यांनी पत्रात नमूद केले आहे .

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!