खते व बी बियाण्यांच्या किमतीवर अंकुश ठेवण्यासाठी तहसीलदारांना निवेदन.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा दिनांक 10 जून 2024 परंडा शहरासह तालुक्यातील अनेक गावात  सध्या  पाऊस पडत आहे शेतकरी राजाने पेरणीपूर्व मशागत केली असून आता पेरणीची ओढ लागलेली आहे  पेरणी पूर्वतयारी साठी बी बियाणे तसेच खत खरेदीसाठी तालुक्यातील बळीराजा परंडा शहरासह तालुक्यातील कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत आहे

 पेरणीसाठी बी बियाणे व खतांच्या मागणीत वाढ होत असल्यामुळे कृषी सेवा केंद्र चालक चढ्या दराने विक्री करत आहे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून प्रशासन गाफील असल्याचे चित्र दिसत आहे
तरी बळीराजाची होत असलेली पिळवणूक थांबविण्यासाठी आपण योग्य तो निर्णय घ्यावा तसेच शेतकऱ्यांची आडवणूक करून ज्यादा पैसे घेत असलेल्या कृषी केंद्र चालकांवर वचक बसावा म्हणून कठोरात कठोर कारवाई करावी
              अन्यथा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार असाल असा इशारा देण्यात आला.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!