राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाची तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाची तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
परंडा [ दि२८ मे ] परंडा तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थीक मदत करा आशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजीक न्याय विभागाच्या वतीने तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की मागील अठवडयात झालेल्या पाऊसाने व वादळी वाऱ्याने शहरासह तालूक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा व शेती पीकांचे मोठया प्रमानात नुकसान झाले आहे.तसेच अनेक कुटूंबाच्या घरावरील पत्रे उडून घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे घरातील संसारोपयोगी साहीत्याचे नुकसान झाल्यामुळे अनेक कुटूंबाचा संसार उघड्यावर पडला आहे.
तसेच वादळी वाऱ्यांने तालुक्यात अनेक ठीकानी विद्युत पोल उखडून पडल्यामुळे अनेक गावाचा विद्यूत पूरवठा खंडीत झाला आहे.त्यामुळे पीण्याच्या पाण्याचा प्रस्न गंभीर बनला आहे.विद्यूत पुरवठा तात्काळ दुरुस्त करण्याचे समंधित विभागाला निर्देश द्यावेत व नुकसान ग्रस्त कुटूंबाच्या घराचे व शेती पीकचे तात्काळ पंचनामे करून समंधीतांना आर्थीक मदत करण्या यावी आशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे, जिल्हा सरचिटनिस घनशाम शिदे, युवक शहर अध्यक्ष खय्युम तुटके, टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा चौधरी,गणी हावरे,रंगणाथ ओव्हाळ, ज्ञानेश्वर काळे,अमोल ओव्हाळ,राहूल अर्जून बनसोडे, ज्ञानेश्वर बनसोडे,राजकुमार गरड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.