आवडीच्या (पसंदीच्या) नंबरसाठी तात्काळ अर्ज करावा.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
धाराशिव दि.17 मे 2024 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी MH-25 BC ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे.
वाहनांची नविन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो.ब-याच वेळा याचा नागरीकांनाही त्रास होतो.नागरीकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा,यासाठी ज्या वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजता दरम्यान विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत. अर्जासोबत केंद्रिय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ व्या नियम ५ अ मध्ये विहित केलेल्या पत्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक राहील. (उदा.आधारकार्ड, लाईट बील,टेलीफोन बील इ.) तसेच आकर्षक क्रमांकासाठी देय असलेल्या विहित शुल्काच्या डी.डी.अर्जासह जमा करणे बंधनकारक आहे.डीडी फक्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,धाराशिव यांच्या नांवे केवळ राष्ट्रीयकृत बँकेचा असावा.या व्यतिरिक्त इतर नावाचे डी.डी.बाद ठरवले जातील.
डीडी कमीत-कमी एक महिना मुदतीमधील असावा.अतिरिक्त रक्कमेचे संबंधित अर्जदारांकडून प्राप्त झालेले डी.डी.चे लिफाफे अर्जदार/प्रतिनिधी यांच्या समक्ष व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव यांच्या उपस्थितीत उघडले जातील.ज्या अर्जदाराने अधिक रक्कमेचा डीडी सादर केला असेल त्यास पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही.नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करुन वाहन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा.अन्यथा राखून ठेवलेल्या नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी शासन जमा होईल.कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.
आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीचे प्राधिकारपत्र याचा नमुना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध आहे.असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी कळविले आहे.
MH-25 BC या नविन दुचाकी वाहनांसाठी मालिका सुरु करण्याचे वेळापत्रक निश्चिंत केले आहे.
आकर्षक क्रमांक/पसंती क्रमांकाचे अर्ज व डी.डी.स्विकारणे – 20 व 21 मे 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत.
एका क्रमांकाचे दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झालेल्या अर्जदारांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डावर प्रसिध्द करणे – 21 मे 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
एकाच क्रमांकाचे दोन किंवा अधिक प्राप्त झालेल्या अर्जासाठी अर्जदार / प्रतिनिधी यांच्याकडून बंद लिफाफ्यात डी.डी.स्विकारणे व त्यांचे समक्ष उघडून आकर्षक क्रमांकासाठी लिलाव करणे – 22 मे 2024 रोजी सकाळी 11.30 वाजेपर्यंत असे वेळापत्रक निश्चित केले आहे.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.