बार्शीतील विजय कोरे यांचा  भगवंत समिती तर्फे सन्मान

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी येथील भगवंत महोत्सवातील दुसऱ्या दिवशी सायंकाळी ठीक सहा वाजता नारदीय कीर्तनाच्या प्रारंभी श्री विजय थोरात यांचा भगवंत कमिटी तर्फे सत्कार संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते श्री बसवराज पुरवंत यांनी उपस्थितांचे स्वागत करून  भगवंत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती श्री विजय थोरात यांच्या संदर्भात श्री पुरवंत म्हणाले की, श्री विजय थोरात यांना ईश्वर भक्तीचे बाळकडू त्यांच्या आजोबा व आईपासून मिळाले. घरातच भक्तिमय वातावरण निरंतर फुलत असल्याने  श्री थोरात यांनी पहिली रचना स्वामी समर्थावर तर दुसरी रचना श्री गणेशावर केली. बार्शीच्या भगवंतावर एकूण त्यांनी 18 रचना दिलेल्या असून ती त्यांच्याच आवाजात स्वरबद्ध केली आहेत. आणखीन सात रचना साकारल्यानंतर एकूण 25 रचनांची छोटीशी पुस्तिका प्रकाशित करून निस्वार्थ भावनेने भगवंत चरणी अर्पण करण्याचा त्यांचा मनोदय असल्याचेही बोलले. भगवंतांच्या नामस्मरणाची त्यांच्या आवाजातील छोटीशी धून ही मंदिरातील भाविकांचे लक्ष वेधून घेते.
             या त्यांच्या कार्याबद्दल भगवंत कमिटीचे माननीय श्री बुडूख दादा, श्री कुलकर्णी व अन्य सदस्यामार्फत भगवंताची  प्रतिमा, पुस्तिका, शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
              श्री विजय थोरात यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!