www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
परंडा प्रतिनिधी दिनांक 9 मे 2024
परंडा तालुक्यातील प्रसिद्ध कालभैरव आणि ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त उद्या 9 मे रोजी महालक्ष्मी मैदान शिरसाव येथे भव्य जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. राज्यातील अनेक प्रसिद्ध पहिलवान या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
स्पर्धेची सुरुवात दुपारी 3 वाजता होणार आहे. लहान मुलांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्यानंतर प्रसिद्ध पहिलवानांच्या कुस्त्यांची सुरुवात होणार आहे. प्रत्येक कुस्तीमध्ये प्रेक्षकांनी उत्सुकतेने कुस्ती पाहण्याचा आणि पहिलवानांना प्रोत्साहन देऊन आनंद घ्यावा.
या जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन शिरसाव येथील ग्रामस्थांनी मिळून केले आहे. या कुस्त्या पाहण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कुस्त्या संपल्यानंतर शेवटी विजेत्या पहिलवानांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
प्रेक्षकांनी या जंगी कुस्त्यांच्या मैदानाचा खूप आनंद घ्यावा.
शिरसाव हे गाव पूर्वी पासून तालुक्यात कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे परंतु काही काळ या कुस्त्या बंद होत्या, खूप दिवसानंतर या कुस्त्यांच्या आयोजन करण्यात आले त्यामुळे या भागात याबद्दल खूप उत्सुकता लागली आहे. येथून पुढे दरवर्षी भव्य कुस्त्यांचे मैदानचे आयोजन करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे.
या जंगी कुस्त्यांच्या मैदानाद्वारे ग्रामीण भागातील कला आणि संस्कृतीचा प्रचार होण्यास मदत होईल.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.