उड़ान फॉउंडेशन च्या वतीने 700 गरजूंना ईदच्या सामानाचे व 70 मुलांना नवीन कपड्याचे वाटप.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

“एक ही सफ़ में खड़े हुवे महमूद ओ अयाज़, न कोई बंदा रहा न कोई बंदा नवाज़”

बार्शी, दी /04/24 रोजी मंगळवार एक कौतुकास्पद कार्यक्रम सम्पन्न झाला ज्यात उडान फाउंडेशन च्या वतीने रमजान ईदसाठी लणारे साहित्यचे किट वाटप या कार्यक्रम मध्ये 700 गरजू, गरीब व विधवा स्त्रियांना गरजू लोकांना ईद उल-फ़ित्र चे उपयोगी साहित्य  तसेच 70 गरजू मुलां मुलींना नवीन कपडे शहर व ग्रामीण मालवंडी, गुलपोळी, बावी,साकत,पांगरी,उपळे (दु),घाणेगाव,शेंद्री इत्यादि भागात वाटप करण्यात आले. किट मध्ये काजू, बदाम, चारुळे, विलयची, मनुके, शेवया, खजूर, तेल पाकीट, गूळ, डालडा देऊन अश्या प्रकारे हा कर्यक्रम संपन्न झाला.

हुशार होतकरू मुलीची वर्षभराच्या ट्युशन फी भरण्यासाठी भरीव मदत करण्यात आली

श्रीमंत-गरीब, मालक-नोकर कसलाही भेद न पाळता खांद्याला खांदा लावून आनंदाने ईद साजरी करता यावी म्हणून. या कर्यक्रमाचे आयोजन मागील 9 वर्षा पासून होत आहे.
लाभार्त्यांची निवड गरजू, गरीब, विधवा, अपंग इ. पात्रतेच्या आधारे विभागाच्या सदस्य मार्फत निवड करून त्याना कुपन वितरित केले जाते त्यानंतर ऊपस्तित गरजुचे स्वागत केले नंतर सामानाचे किट देवून त्यांना निरोप दिला .

बार्शी येथील उडान फाउंडेशन खूप चांगलं काम गेल्या 9 वर्षापासून सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात करत आहे  रमजान च्या महिन्यात हा कार्यक्रम यशस्वी रित्या घेतला जातो, त्या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने गोरगरीब वंचित लोकांना अन्नधान्य आणि ईद साठी लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू रुपी मदत केली जाते खूप चांगल्या प्रकारचा हा उपक्रम असून येणारे पुढच्या काळात समाजा ला शक्य होईल तेवढी मदत व सहकार्य फाउंडेशन च्या वतीने करण्यात येईल

तसेच उड़ान फॉउंडेशन ने मागील काळात रक्तदान, माफक दरात रुग्नवाहिका, लॉकडाउन काळात 3500 किराना किट गरुजुना वाटप, लग्नकार्य व हॉस्पिटल साठी मदत, शिबिर, व्याख्यान इत्यादी अनेक उपक्रम यशस्वी रित्या राबविले आहेत.

“उडाण फौंडेशन”.
अल्पावधीतच बार्शी शहर व तालुक्यात प्रसिद्ध झालेले किंबहूना लोकप्रिय झालेले नाव. आमच्या बार्शी शहरातील अगदी सामान्य कुटुंब, सामान्य परिस्थिती, कष्टकरी परिवाराची पार्श्वभूमी असताना सुद्धा उडाण फौंडेशनची मुलं आज सामाजिक कार्यांमध्ये इतरांपेक्षा दोन पावले पुढे गेलेली आहेत. आज जेथे कोठे सामाजिक मदतीची अपेक्षा असते तेथे आपसूकच उडाण फौंडेशनचे नाव सर्वप्रथम व हक्काने घेतले जाते. याची बरीचशी उदाहरणे आम्ही बार्शीकरांनी अनुभवली आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात सक्रिय असताना देखिल ही सर्व मंडळी समाजहिताच्या दृष्टीने जनकल्याणाचा वसा घेऊन एकत्रित येतात, फौंडेशनच्या आज वरच्या कोणत्याही सामाजिक कार्यक्रम असो,  सामाजिक विषमतेवरही नेहमीच संयम व लोकशाहीवादी भूमिका घेतली गेलीय. गोर गरीब वंचित गरजू लोकांच्या आयुष्यात  सुखाची हिरवळ, फुल न फुलाची पाकळी म्हणून उडाण फौंडेशनने केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे, आजच्या कार्यक्रमाला 11 वा सुरुवात झाली आणि 6 वा कार्यक्रमाची सांगता झाली.

सर्वात शेवटी लाभार्थ्यांच्या चेऱ्यावरील समाधान व आनंद  अगदी स्पष्ट दिसत होते ह्या अविस्मरणीय दृश्य पाहून कार्यक्रमचे सार्थक झाल्याचा वाटले ।

कार्यक्रमाचे सूत्र संचालन संघटनेचे सचिव जमिल खान व आभार प्रदर्शन शबीर वस्ताद यानी केले. या उपक्रम चे प्रकल्प प्रमुख सल्लागार युनूस शेख यांनी अथक परिश्रम घेतले उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष जाफर शेख, कार्याध्यक्ष शकिल मुलाणी,  खजिनदार शोएब काझी, जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, कॉम्रेड अयूब शेख, मोहसीन पठाण,साजन शेख, मुन्ना बागवान, रॉनी सय्यद, मोहसिन मालिक, जमीर तांबोळी, रियाज बागवान, राजू शिकलकर, ऑड रियाज़ शेख, मोईन नाईकवाडी, इक्वाल शेख, इरफान बागवान, शोएब सय्यद, मुज़म्मिल जावळेकर तौसिफ बागवान, वसिम मुलाणी, सादीक काझी, अल्ताफ शेख, इंजिनिअर एजाज शेख, जावेद शेख, अकील मुजावर आदीनी सहकार्य केले .

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!