स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा प्रतिनिधी (दि 2) धाराशिव येथील पत्रकार रवींद्र केसकर यांच्यावर अज्ञात गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ परंडा येथे पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला
धाराशी जिल्ह्यातील दैनिक संचारचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र केसकर हे सोमवार दिनांक एप्रिल रोजी कार्यालयीन कामकाज आटपून सायंकाळी साडेसातच्या सुमारास घराकडे जात असताना धाराशिव ते बेंबळी वळण रस्त्यावर पाच अज्ञात हल्ले करणे तोंडाला रुमाल बांधून पत्रकार केसकर यांच्या गाडीसमोर आडवी लावून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत चाकूचा धाक दाखवत भ्याड हल्ला केला त्यांची मोटर सायकल पळून नेऊन काही अंतरावर फेकून देण्यात आली.
या घटनेचा परंडा तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करण्यात येत आहे . तरी सदरील आरोपीस पत्रकार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अशा गुंडांचा पोलिसांनी शोध घेऊन मुस्क्या आवळ्याव्यात.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पत्रकावर हल्ले होण्याची शक्यता आहे. तरी पोलीस प्रशासनाने या घटनेच्या गांभीर्य पाहून वेळेत कार्यवाही करावी अशी मागणी पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे असे निवेदन तहसील कार्यालय परंडा येथे देण्यात आले. यावेळी पत्रकार प्रकाश काशीद प्रमोद वेदपाठक , मुजीब काझी, तानाजी घोडके, श्रीराम विद्वत, विजय माने, गणेश राशनकर, संतोष शिंदे , रावसाहेब काळे, आनंद खर्डेकर, सचिन कुलकर्णी, शंकर घोगरे ,फारुख शेख ,विजय मेहेर निसार मुजावर आधी सह पत्रकार बांधव उपस्थित होते.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.