अखेर २० वर्षांनी होणार दिव्यांगाचे सर्वेक्षण.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
प्रतिनिधी: राज्यात तीस वर्षांनी दिव्यांगांच्या लोकसंख्येबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे मराठा समाजासाठी ज्या पद्धतीने मोबाईल ॲप द्वारे राज्यभर सर्वेक्षण करण्यात आले त्यानुसारच कर्मचारी घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करणार आहेत यापूर्वी पाच जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून उर्वरित 31 जिल्ह्यामध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे
राज्यात 2011 च्या जनगणनेनुसार 29 लाख 63 हजार दिव्यांग आहेत एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण 2.6% इतके आहे मात्र ही संख्या निर्धारित करताना दिव्यांगत्वाचे केवळ सात प्रकार निश्चित करण्यात आले होते राज्यात 2016 च्या दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा संमत करण्यात आला त्यानुसार दिव्यांगाचे प्रकार 21 करण्यात आले या कायद्यानुसार दर पाच वर्षांनी सर्वेक्षण करण्याची तरतूद आहे मात्र असे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही
सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने जिल्हास्तरीय समितीची स्थापना केली आहे त्यात जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष तर महानगरपालिका स्तरावर महापालिकेचे आयुक्त अध्यक्ष म्हणून काम पाहतील यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तरी सर्व दिव्यांग बांधवांनी सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या प्रतिनिधीला आपली माहिती व्यवस्थित सांगून आपलं सर्वेक्षण करून घ्यावे असे मत दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके यांनी व्यक्त केले आहे

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!