www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी : व्हॉईस ऑफ मीडियाच्या बार्शी शहर शाखेच्या वतीने पत्रकार बांधव व त्यांचा कुटुंबांसाठी शनिवार दि.१६मार्च २०२४ रोजी सकाळी ९.३० ते ३ या वेळेत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात कॉलेस्ट्रॉल, लिव्हर, थायरॉईड, किडनी, डायबेटिस, लोह, ब्लड प्रेशर, ई.सी.जी. व नेत्र तपासणी वैद्यकीय मार्गदर्शन उपचार मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. तरी बार्शी शहर व परिसरातील पत्रकार बांधवांनी आपल्यासह आपल्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन शहराध्यक्ष हर्षद लोहार यांनी केले.
या आरोग्य शिबीरासाठी व्हॉईस ऑफ मीडिया चे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय शिंगाडे, जमीर कुरेशी,मयुर थोरात, प्रविण पावले, शाम थोरात, प्रदिप माळी, मल्लिकार्जुन धारूरकर, निलेश झिंगाडे, ओंकार हिंगमिरे, समाधान चव्हाण हे परिश्रम घेत आहेत.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.