बार्शी मध्ये होणार लाईव्ह युवा संसद आणि नारी शक्तीचा जागर…

starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

प्रतिनिधी : बार्शी, दि.4/3/2024
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्राच्या वतीने देशभरातील युवक – युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, पर्यावरण आदी विषयक विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून युवकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी नेहरू युवा केंद्र सोलापूरच्या वतीने, क्रांती बहुउद्देशीय संस्था, बेलगाव व श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम व नारीशक्ती या विषयावर पंढरपूरचे नंदकुमार दुपडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन श्री संत तुकाराम सभागृह, श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी या ठिकाणी दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील तमाम युवक – युवतींनी सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नेहरू युवा केंद्र सोलापूरचे जिल्हा युवा अधिकारी अजितकुमार यांनी केले आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!