उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे पोलीओ मिशन  प्रभातफेरी.

starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

परंडा प्रतिनिधी दि – 1 मार्च 2024.       उपजिल्हा रुग्णालय व जिजामाता विद्यामंदिर शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पल्स पोलीओ मिशन  प्रभातफेरी उद्घाटन
उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे मा.जिल्हाशल्यचिक्सक डाॅ.मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनानुसार व वैद्यकीय अधिक्षक डाॅ. व्हि.डी .कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक 01/03/2024 रोजी जिजामाता विद्यामंदिर शाळा येथे परंडा येथिल तहसीलदार मा.आडसूळ. नायब तहसीलदार तसेच  वैद्यकीय अधिक्षक व्ही.डी कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रीय पल्स पोलीओ जनजागृतीपर प्रभात फेरीचे हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.सदरीलन पल्स पोलीओ जनजागृतीपर रॅली यशस्वी करण्यास 0 ते 5 वर्ष आतील सर्व बालकांची पोलीओ डोस घेण्यात यावा असे आवाहन तहसीलदार मा आडसूळ व वैद्यकीय अधिक्षक व्ही.डी कुलकर्णी यांनी केले तसेच या रॅलीत वैद्यकिय अधिकारी डाॅ.अबरार पठाण,आरोग्य दुत बालाजी नेटके,कोकाटे,गुंजाळ तानाजी  समुपदेशक, विक्रम वाघ,रविंद्र करपे,औंकार वरपे,मकरंद वांबुरकर, अधिपरिचारीका शिवगंगा गायकवाड, थिटे आऊबाई, जोशी ड्रायव्हर, जिजामाता विद्यामंदिर शाळा मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक, शिक्षिका, व विद्यार्थ्यां यांनी सक्रिय सहभाग घेवुन राष्ट्रीय पल्स पोलीओ जनजागृतीपर कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!