छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त  रक्तदान शिबीर.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा (दि१६फेब्रुवारी24) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ परंडा शाखेच्या वतीने दि१६फेब्रुवारी रोजी गटशिक्षण कार्यालय परंडा येथे महारक्तदान शिबीर घेण्यात आले.
            या रक्तदान शिबीराचे  उदघाटन पोलिस निरिक्षक विनोद इज्जपवार साहेब,गटविकास अधिकारी संतोष नागटिळक साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी  या कार्यक्रमासाठी गट शिक्षण अधिकारी अर्जुन जाधव साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी अशोक खुळे,दादासाहेब घोगरे ,सूर्यभान हके साहेब , तलाठी चंद्रकांत कसाब साहेब , मंडळ अधिकारी योगेश जगताप , मा.पंचायत समिती सदस्य पोपट चोबे, गोविंद जाधव सर श्री.जयदेव गोफणे, विश्वास मोरे, शिवाजी पाटील , रवी मोरे , मोरजकर सर ,  अरविंद रगडे डॉ प्रशांत मांजरे , रेवणदादा ढोरे , अमोल गोडगे , आजीनाथ शेळके , वैजिनाथ नरके , सोमनाथ टकले , नागनाथ रगडे , भागवत घोगरे , विनोद सुरवसे, रमेश शिवणकर , महादेव राऊत  यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित  होते.
       ‘रक्तदान हे अनमोल दान आहे’ या साठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सदैव शिवजयंती चे औचित्य साधून रक्तदानाचे आयोजन करत असतो. यंदा रक्तदानाचे हे सलग सहावे वर्ष आहे . या रक्तदान शिबिरामध्ये प्राथमिक शिक्षक यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते युवक, युवती, महिला मंडळ, यांचा सहभाग अतिशय हिरीरीने असतो.        
      *आज या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 121 रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून सामाजिक भान  जपले.*
       या रक्तदान शिबिरामध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता काही महिलांचा एच बी कमी भरल्या कारणाने त्यांना रक्तदान करण्याची इच्छा असूनही ते करता आले नाही.
या शिबिरातील लक्षनीय बाब म्हणजे शिबिरात एकूण 33 जोडप्यांनी एकत्रित रित्या रक्तदान करून एक मोलाचा संदेश समाजाला दिला आहे.
         या रक्तदान शिबीरात  संघाच्या महिला अध्यक्ष प्रिती वीर ,साधना पंडित,मिनाक्षी नकाते,अर्चना कोकाटे,वंदना इंगळे,सुवर्णा खटाळ , शोभा करळे, ज्योती मिसाळ ,यांच्यासह अनेक महिला शिक्षकांनी रक्तदान केले.तसेच परंडा येथिल क्रांती अकॅडमीचे संचालक पांडुरंग कोकणे यांच्या सह विद्यार्थांनी रक्तदान शिबीरात सहभाग घेऊन रक्तदान केले.
       शिक्षक संघाच्या वतीने गत सहा वर्षा पासुन शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर घेण्यात येत असुन या रक्तदान शिबिरास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी भेट देऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कौतूक केले. व रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप केले.
           रक्तदान शिबीर यशस्वितेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष सुधीर वाघमारे,तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे,साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर देवराम,माजी चेअरमन जयदेव गंभीरे,जिल्हा संचालक रविंद्र कापसे,सचिव दैवान पाटील व्हा.चेअरमन अप्पासाहेब भोंग,शरद नवले,नितीन गायकवाड, प्रकाश ठवरे,शिवाजीराव पंडीत,धनाजी खरात, बाळासाहेब जायभाय, उमेश काळे , मिसाळ तानाजी, विजयकुमार माळी,रविंद्र थोरात, जगन्नाथ साठे, श्रीमंत चौरे,यशवंत कानगुडे , धनंजय करकर , नितीन गायकवाड , सर्जेराव ठोकळ ,भाऊसाहेब जगताप, आदिकराव शेळवने,सचिन केमदारणे, हेमंत मस्के ,शिवाजी कांबळे,सुभाष देवकर, लक्ष्मण काळे, गणेश भाग्यवंत, निंबाळकर महेश,शरीफ मुलाणी, तानाजी तरंगे, तसेच महीला आघाडी यांनी परिश्रम घेतले.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!