रा गे  शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे.
परांडा दि . 13 फेब्रुवारी 2024 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे  शिंदे महाविद्यालय परांडा व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने विभागाचे विशेष श्रमसंस्कार वार्षिक शिबिर मोजे आंदोरा तालुका परंडा येथे आयोजित करण्यात आले आहे . सक्षम युवक व सशक्त भारत या ब्रीद वाक्याच्या अनुषंगाने शिबिरामध्ये रेड रिबन क्लब उपजिल्हा रुग्णालय परंडा आणि भगवंत ब्लड बँक बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व एचपी शुगर बीपी एच आय व्ही व इतर तपासण्या तसेच आयुष्यमान कार्ड नोंदणी इत्यादी उपक्रम राबविण्यात आले होते .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मौजे आंदोरा येथील ग्रामस्थ प्रा डीव्ही शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .  राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा अमर गोरे पाटील प्रा डॉ कृष्णा परभणे तसेच सह कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ अरुण खर्डे प्रा डॉ सचिन चव्हाण प्रा डॉ सचिन साबळे प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते . यावेळी  प्रा गजेंद्र रंदील  प्रा डॉ प्रशांत गायकवाड प्रा डॉ एच एम गायकवाड प्रा डॉ संतोष काळे  प्रा आर के राजुरे प्रा सावंत के.एस . प्रा सौ सातव प्रा. गिता सुर्यवंशी यांची उपस्थिती होती
    यावेळी शिक्षकेतर कर्मचारी उत्तम माने हनुमंत कुठे संतोष राऊत सुनंदा कोठुळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले .यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील अमोल वांबुरकर तानाजी गुंजाळ यांच्यासह अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .महाविद्यालयातील व आंदोरा गावातील अनेक विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी रक्तदान केले आणि आणि विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!