महाराष्ट्र विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Picture of starmazanews

starmazanews

डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त दिनांक ०६/०२/२०२४ वार मंगळवार रोजी महाराष्ट्र विद्यालय बार्शी याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते



प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सहसचिव श्री.ए.पी.देबडवार, संस्थेचे खजिनदार तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री जयकुमार शितोळे व संस्था तथा शाळा समिती सदस्य श्री.बी.के. भालके या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.सोबत विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे,उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे,पर्यवेक्षक श्री.एस. सी‌.महामुनी,पर्यवेक्षक श्रीमती एन.बी. साठे,प्रा संजय बागल व प्रा किरण गाढवे उपस्थित होते.
संस्थेचे खजिनदार श्री जयकुमार शितोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमात पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये देवता, छत्रपती शिवाजी महाराज, विविध सिनेमा मधील वैयक्तिक व सामूहिक गाण्यावरील नृत्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी अतिशय उत्कृष्ट असे नृत्याचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस.एल.शिंदे व श्रीमती एस.जी. कातळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती एस.एल.शिंदे यांनी केले.

याप्रसंगी सर्व विद्यार्थी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!