उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे आयुष्यमान भव अंतर्गत कर्करोग दिनानिमित्त आरोग्यशिबीर संपन्न

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे मा.जिल्हाशल्यचिक्सक डाॅ.मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनानुसार व वैद्यकीय अधिक्षक डाॅ. व्हि.डी .कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक 03/2/2024 रोजी उपजिल्हा रुग्णालय परंडा मध्ये, कर्करोग,तपासणी ,निदान उपचार,संदर्भ सेवा,18+ आरोग्य तपासणी व आयुष्यमान भारत कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले.सदरील नोंदनी करुन कार्ड काढण्यात आले तसेच **आयुष्यमान कार्ड* देखील काढण्यात आले व वैद्यकीय अधिकारी डॉ.पन्हाळे आर्थोपेडीक तज्ञ यांनी सहभाग घेवुन व डाॅ.अभिजित खरटमल यांनी शिबीरात सर्व रुग्णांना आयुष्यमान भव कार्यक्रम अंतर्गत कर्करोग तपासणी, निदान उपचार, संदर्भ सेवा,आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड नोंदणी व वितरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले व गरजु रुग्णांना कानाची मशीन वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमात आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती,तोंडाची तपासणी,गर्भाशय कर्करोग,मुखकर्करोग,स्तनाचा कर्करोग,ई.तपासनी करन्यात आली व मार्गदर्शन केले.तसेच कर्करोगावरील, रुग्णालयातील योजनेबद्दल मार्गदर्शन समुपदेशक मकरंद वांबुरकर यांनी केले सदरील कार्यक्रमात तज्ज्ञ डाॅ.अंकुश पवार ,आरोग्य कर्मचारी वाघ विक्रम, औषधनिर्माण अधिकारी जितेंद्र ओव्हाळ,अधिपरिसेविका रुपाली सौताडेकर, नागेश रनखांब, जगदाळे ज्योती,थिटे आऊबाई ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ रविंद्र करपे ,अमर पठाण, अनिल भोसले ईतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी परिश्रम घेतले व कार्यक्रमात तानाजी गुंजाळ समुपदेशक उपस्थित सर्व रुग्णांना आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, काडुन घेण्यात यावे असे आवाहन केले व मुखाचा कर्करोग,स्तनाचा कर्करोग,गर्भाशय कर्करोग याची तपासनी सर्व रुगांनी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले.तसेच आभारप्रदर्शन व मार्गदर्शन तानाजी गुंजाळ यांनी करुन सूत्रसंचालन केले शिबीरात अवयवदान फार्म भरून घेण्यात आले.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!