परंडा बसस्थानक परिसरात वृक्षारोपण.

Picture of starmazanews

starmazanews

परंडा,त.२२ (प्रतिनिधी) गोरख देशमाने . परंडा -येथील बसस्थानक परिसरातील पाठीमागील बाजुस वृक्षारोपण करताना आगारप्रमुख उल्लास शिनगारे,मुजीब काझी,प्रकाश काशीद,अंकुश जाधव आदि उपस्थित होते! स्व.बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानाअंतर्गत परंडा बसस्थानकात सोमवार दि.२२ रोजी स्वच्छता मोहीम राबवुन बसस्थानक पाठीमागील बाजुस विविध रोपांचे,फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
बसस्थानक परिसरात मागील कांही दिवसापासुन स्वच्छता मोहिम सुरु आहे.बसस्थानकाच्या बाजुस यापुर्वी कायम मोठी दुर्गंधी असायची.आगारप्रमुख उल्लास शिनगारे यांनी पुढाकार घेऊन जीसीबी मशिनने केरकचरा,दुर्गंधी काढुन परिसर स्वच्छ करीत तारेचे कुंपण मारले.याठिकाणी विविध रोपांची लागवड केली आहे.सोमवार रोजी वृक्षमिञ आप्पासाहेब बल्लाळ यांनी विनामुल्य ७५ रोपवाटिका दिली आहे.तसेच दिव्यांग संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष पांडुरंग मिसाळ यांनी फुलझाडासह विविध २० रोपे दिली आहेत.या रोपांचे वृक्षारोपण व्हाईस आॕफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद,तालुका कार्याध्यक्ष मुजीब काझी,जि.प.कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश जाधव,पांडुरंग मिसाळ यांच्या हस्ते ठिकठिकाणी विविध झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले.बसस्थानकात प्रवाशांसाठी स्वच्छ पीण्याच्या पाण्याची पाणपोईची सोय करण्यात आली.यावेळी बसआगार प्रमुख उल्लास शिनगारे,वाहतुक नियंञक कासीम मुलानी,जुल्फीकार जिनेरी,सेवक प्रभाकर थिटे,दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष पांडुरंग मिसाळ,पांडुरंग चोबे,नुरभाई मदारी,सेवक अनिता शिंदे आदिसह नागरीक उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!