ब्रम्हकुमारी केंद्रात दिल्या जाणाऱ्या संदेशाचा अधिकाधिक प्रसार करण्याची आवश्यकता – डॉ आनंद मोरे.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

संपूर्ण विश्वाचे कल्याण आणि शांतीचा संदेश ब्रम्हकुमारी केंद्रात दिला जातो. या संदेशाचा अधिकाधिक प्रसार करण्याची आवश्यकता आहे असे मत डॉ आनंद मोरे यांनी व्यक्त केले.
परंडा प्रतिनिधी
येथील ब्रम्हकुमारी केंद्रात मूळ संस्थापक ब्रम्हाबाबा यांच्या 55 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बहन — उपस्थित होत्या.
आजच्या या धकाधकीच्या धावपळीच्या युगात मनुष्यभौतिक प्रगती नेत्रदीपक करत आहे मात्र आत्मिक विकासापासून कोसो दूर मानव जात आहे . यामुळेच आजकाल मनोकायिक आजार यांनी डोके वर काढले आहे . सुख समाधान शांतीपूरक जीवन जगायचे असेल तर मनुष्य जीवनाला अध्यात्माची झालर लागते . ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये राजयोग मेडिटेशन याचे शिक्षण घेतल्याने स्व स्वरूपाची जाणीव निर्माण होऊन तान तनाव मुक्त राहण्यासाठी मदत होते . यामुळे स्वतः कोण ,तो ईश्वरी शक्ती कोण ? त्याचा माझा संबंध काय ? आणि या विश्वाच्या रंगमंचावर कुठल्या कारणासाठी मी आलो आहे ? याची आत्मचिंतन आत्मशोध घेण्याच्या वृत्तीने मनुष्य आत्मकल्याणासह विश्व कल्याणी बनतो . अशा ध्यानधारणा व ज्ञानाच्या साधनेने मनुष्य दीर्घकालीन आजारापासून स्वतःचा बचाव करतो . ताण तणावामुळे हार्मोनल इम्बॅलन्समुळे जे दीर्घकालीन सायलेंट किलर आजार निर्माण होतात ती सुद्धा हळूहळू बरे होण्याच्या मार्गावर लागतात . त्यामुळे राजयोग मेडिटेशन शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे ही काळाची गरज बनली आहे . त्यामुळे शारीरिक मानसिक आत्मिक अशा सर्वांग सुंदर आरोग्य मिळवणे हेतू सुख शांतीचा संदेश देणाऱ्या ब्रह्मकुमारी सेंटरला भेट द्यावी असे अनुभवजन्य विचार व्यक्त केले .
यावेळी डॉ आनंद मोरे यांनी ब्रम्हकुमारी केंद्रात आलेले अनुभव सांगितले. ब्रम्हकुमारी केंद्राच्या माध्यमातून विश्वशांती व आत्मकल्याण यांचा मार्ग दाखवला जातो. याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शहर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!