विभागीय आयुक्तांकडून तडीपारीचा आदेश रद्द

Picture of starmazanews

starmazanews



पुणे प्रतिनिधी.सोमनाथ गायकवाड.
बंडगार्डन, लोणीकंद व समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी शक्ति उर्फ लकी विलास इनरकर याला पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. या विरोधात आरोपीने विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आरोपी शक्ति उर्फ लकी इनरकर याच्यावरील तडीपारीचे आदेश रद्द केले असल्याची माहिती अॅड. प्रशांत पवार यांनी दिली.

शक्ति उर्फ लकी विलास इनरकर याला पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 यांनी जुलै 2023 मध्ये तडीपार केले होते. याविरोधात इनरकर याने अॅड. पवार यांच्या मार्फत विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. यावर 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत अॅड. पवार यांनी आरोपीची बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून विभागीय आयुक्तांनी निर्णय राखून ठेवला होता. बुधवारी (दि.19) या प्रकरणावर सुनावणी करताना विभागीय आयुक्तांनी शक्ति उर्फ लकी इनरकर याच्या तडीपारीचा आदेश रद्द केला आहे.

अॅड. पवार यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, अपिलार्थी याला न्यायालयाने सर्व गुन्ह्यात जामीन मान्य केला असून कोणताही संबंध नसताना जाणून बुजून व हेतुपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला आहे.  बंडगार्डन व समर्थ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा न्यायप्रविष्ठ आहे. तर समर्थ पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे तपासावर आहेत. अपिलार्थी यांच्या संदर्भातील कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रित्या सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे तपास अधिकारी यांनी सादर केले नाहीत. तसेच चार प्रलंबित केसेसमध्ये दोन केसेस या गेली दोन वर्षांपासून तपासवरच असून अद्यापही दोषारोप पत्र दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे तडीपारीचा आदेश फेटाळण्याचे आदेश पारीत करावेत असा युक्तीवाद अॅड. पवार यांनी केला. ॲड. अंकिता बागल यांनी सर्व कामकाज पाहिले.

विभागीय आयुक्तांनी सरकारी व आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून आरोपीचे अपील मान्य केले. तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी काढलेले तडीपारीचे आदेश संपुष्टात आणण्यात येत असल्याचे आदेश दिले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!