पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:-दि.१९ तळवडे
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चोबे साहेब व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत तळवडे ग्रामस्थांच्या झालेल्या चर्चेनुसार तळवडे परिसरातील वाहतुक समस्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पोलीस प्रशासन व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व तळवडे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये तळवडे येथे प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक व रस्ते समस्या यासंदर्भात मीटिंग झाली
आज दि. १९ रोजी मा.बांगर साहेब (डी.सी.पी. पिंपरी चिंचवड शहर) मा.टोनपे साहेब. मा. मकरंद निकम साहेब. (शहर.अभियंता) मा.ओंभासे साहेब (सह.शहर अभियंता) मा.शिनकर मॅडम.(कार्यकारी अभियंता) मा. बापू गायकवाड साहेब.पि.चि.म.न.पा.यांच्यासह तळवडे ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदरील तळवडे परिसरातील ट्रपिक संदर्भात चर्चा करण्यात आली. उपरोक्त अधिकाऱ्यांनी ट्राफिकच्या सर्व समस्या सोडविल्या जातील असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. तळवडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या मिटिंगमध्ये तळवडे परिसरातील ट्राॅपिक समस्या बाबत दि.१८-१२-२०२३ रोजी माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे साहेब व तळवडे ग्रामस्थ यांच्यामध्ये मीटिंगमध्ये खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.१) कॅनबे चौक, हनुमान चौक, तळवडे मेन चौक, राणे कंपनी चौक, जोतिबा नगर चौक, गणेश नगर चौक, उमा बेकरी चौक, त्रिवेणी नगर चौक इत्यादी ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी व वॉरडन ची नेमणूक करावी. तसेच शाळेच्या ठिकाणी रोड क्रॉसिंग नेमणूक करावी. आवश्यकतेनुसार पोलीस कर्मचारी यांची संख्या वाढवावी.
२) तळवडे वाहतूक विभागाला कायमस्वरूपी पोलीस अधिकारी मिळावा.
३) सर्व चौकामध्ये आवश्यकतेनुसार गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग साठी परवानगी द्यावी.
४) अवजड वाहनांवर सकाळी ८ ते ११ पर्यंत तसेच संध्याकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत बंदी घालण्यात यावी (परिसराच्या बाहेरून येणाऱ्या वाहनांवर)
५) कॅनबे चौक ते त्रिवेणी नगर मुख्य रस्त्यावर वाहनांची पार्किंग करण्यात येऊ नये ( सम,विषम,पट्ट्यात)
६) उपरोक्त चौकामध्ये नेमणूक केलेले कर्मचारी नेमून दिलेल्या वेळेत उपस्थित असावेत व त्यांची इतरत आंदोलनासाठी नेमणूक करू नये.
७) गर्दीच्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये व यामधून तेथील रहिवाशांना सवलत मिळावी.
८) आती जोरात जाणाऱ्या वाहनांवर व वाहन चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
या सर्व मुद्यांवर चर्चा करून पुढील दिवसांत वाहतूक कोंडीचे नियोजन करून वाहतूक सुरळीत चालू होईल असे. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.