आगीत मृत्यू झालेल्या कामगारांना २० लाख अर्थसहाय्य द्यावे – काशिनाथ नखाते

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- दि.१४ पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील तळवडेतील शिवराज इंटरप्राईजेस वाढदिवसाच्या केक वर वापरल्या जाणाऱ्या स्पार्कल कॅण्डल तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये ८ डिसेंबर रोजी झालेला स्फोट आणि आगे मध्ये ११ कामगारांचा मृत्यू झालेला असून यामध्ये महापालिका, पोलीस प्रशासन, कामगार विभाग अशा सर्व शासकीय यंत्रणा दोषी आहेत. यातील संबंधित दोषीवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये अर्थसाहित देण्याचे मागणी राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नाकाते यांनी केली आहे. याबाबत पुण्यातील सहाय्यक कामगार आयुक्त अभय गीते यांना निवेदन देण्यात आले. कर्मचारी संघटनेचे सहसचिव चंद्रकांत कुंभार, कार्याध्यक्ष नाना कसबे, सलीम डांगे यांच्या शिष्टमंडळाने भेटून पुणे जिल्ह्यातील कामगारांच्या सुरक्षा ते बाबत चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी केवळ ५ लाख रुपये जाहीर केले आहेत. मात्र ती कमी रक्कम असून प्रत्येक कुटुंबीयांना वीस लाख रुपये देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. नकाते यांनी मुख्यमंत्री कामगार आयुक्त, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, औद्योगिक सुरक्षा यांच्याकडेही याविषयी चर्चा करून मृत कामगारांना २० लाख रुपये अर्थसहाय्य करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!