स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा – परंडा शहरातील ब्रह्मांडनायक बाळूमामा मंदिर या ठिकाणी मासिक अमवस्शा उत्सवाच्या निमित्ताने ह भ प नागेश महाराज मांजरे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.
यावेळी कीर्तनामध्ये मांजरे महाराज यांनी संत बाळूमामा महाराजांचे चरित्र सांगितले या जगामध्ये संतांनी असे दुकान मांडले आहे की त्या दुकानांमध्ये सर्व प्रकारचा माल अगदी मोफत दिला जातो . या पृथ्वीतलावरती संत मानवी जीवनाच्या उद्धाराकरता अवतार घेत असतात. असे उद्गार यांनी कीर्तन सेवामध्ये काढले.
मंदिरामध्ये सकाळी पाहटे श्री संत ब्रह्मांडनायक बाळूमामा मूर्तीला अभिषेक करुन आरती करण्यातआली. त्यानंतर स्वामी समर्थ भजनी मंडळ, सद्गुरु कृपा महिला भजनी मंडळ ,भोंजा, कुंभेजा, सोनगिरी भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर कीर्तन सेवा व कीर्तन सेवा नंतर आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी. विशेष सहकार्य व मार्गदर्शन ह भ प बालाजी महाराज बोराडे यांचे लाभले. यावेळी ह भ प काकासाहेब महाराज गवारे ह भ प भाग्यवंत महाराज रोडगे ह भ प तात्या महाराज हजारे ह भ प शहाजी महाराज लांडगे ह भ प मारुती महाराज बारस्कर ह भ प नाना महाराज रोडगे,अकुशं जमदाडे बळीराम कोळी,भरत देवकर,यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी अन्नदाते मार्तंड निवृत्ती मदने, चहा व्यवस्था गणेशसिंह सिद्धिवाल, कण्या अबिलं व्यवस्था अनंतसिंह सद्दिवाल, भाजीपाला व्यवस्था बाळासाहेब पाडुळे , पाणीजार नियोजन भालचंद्र अवसरे, या कार्यक्रमासाठी सहकार्य राजेंद्र मदने, नागेश मदने,गणेश आदलिंगे भारतसिहं ठाकुर,नागनाथ देवकते ,जगन्नाथ मदणे ,कल्याण मदणे,उतरेश्वर सुरवशे, प्रेम ठाकुर,याचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्रीमती केशरताई वैरागे मदने यांनी केले होते.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.