पुणे येथे १३ ते १७ डिसेंबर रोजी भारतातील सर्वात मोठे ” किसान”कृषी प्रदर्शन.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- दि. १२ भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान १३ ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र मोशी भोसरी जवळ पुणे येथे आयोजित होत आहे. १५ एकर प्रदर्शन क्षेत्रावर ४५० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक, शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात ५ दिवसांमध्ये देशभरातून १ लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील. असा अंदाज आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. किसान प्रदर्शनाला शेती क्षेत्रातील मान्यवर, संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे. यांना किसान प्रदर्शनात संरक्षित शेती आणि नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघुउद्योग अशी विभागावर दालने उभी करण्यात आलेले आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. मोबाईलचा वाढता वापर आणि डिजिटल इंडिया उपक्रमामुळे शेतकऱ्यांशी संवाद साधने शक्य झाले आहे .यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकऱ्यासमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रमुख्याने बाजार भाव, जल, व्यवस्थापन ,शेतीमालाचे मूल्यवर्धन ,जैवतंत्र या क्षेत्रात नवनवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधीची माहिती देऊ शकतील. प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील नव उद्योग जकांसाठी स्पार्क या दालनाचा समावेश असणार आहे. ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञान व नाव कल्पनांना चालना देण्यात येईल पूर्व नोंदणी प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर मोबाईल ॲप द्वारे आगावू नाव नोंदणीची सोय केली आहे. १८राज्यातील शेतकऱ्यांनी पूर्व नोंदणी केली असून ही संख्या १ लाख ओलांडण्याची अपेक्षा आहे. प्रदर्शकांची माहिती व संपर्क किसान मोबाईल ॲप वर सहभागी कंपन्या व त्यांच्या उत्पादनाची माहिती उपलब्ध आहे. नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा प्रदर्शक संस्थांची संवाद प्रदर्शनाच्या आधीपासूनच सुरू झाला आहे. किसान प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी १३ तारखेला सकाळी९ वाजता प्रदर्शन स्थळे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते करण्यात येत आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!