स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा प्रतिनिधी दि – ८
दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा व कांदा निर्यात बंदी उठवावी .अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने काल दिनांक ८ रोजी तहसीलदार परंडा यांना दिला आहे .
सरकारने काल अचानक कांदा निर्यात बंदी केल्याने साडेचार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल जाणार कांदा दीड ते दोन हजारापर्यंत खाली आला आहे .एकरी कांदा उत्पादन खर्च व त्यातून निघणारे उत्पन्न याचा कोणताच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना एकरी दहा ते पंधरा हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे .शासनाने तत्काळ कांदा निर्यात बंदी उठवून निर्यातीस चालना द्यावी . तसेच .
शासनाचा दुध तीन पाच आठ पाच क्वालिटी साठी 34 रुपये दर आहे . मात्र सध्या २५ ते २७ रु प्रति लिटर दर मिळत आहे . दूध संघ व दूध कंपन्या संगणमत दूध उत्पादकांना लुटत आहेत . हे थांबवण्यासाठी शासनाने कडक उपाययोजना करून दूध भेसळ रोखावी . व गाईच्या दुधाला चाळीस रुपये व म्हशीच्या दुधाला नव्वद रुपये प्रति लिटर दर देण्यात यावा व निषेध म्हणून उदया दि ९ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे . निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शंकर घोगरे, रामेश्वर नेटके , अमोल तिंबोळे.सोमनाथ तिंबोळे ,संकेत करळे, सत्यवान पाटील, गोरख गायकवाड, उमेश करळे, सज्जन करळे , प्रवीण करळे इत्यादी शेतकरी उपस्थीत होते
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.