www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
परंडा प्रतिनिधी, दिनांक ८/१२/२०२३ परंडा तालुक्यातील सिरसाव येथे परंडा आगाराची परंडा ते वाकडी ही सिरसाव बार्शी अशी फेरी नव्याने सुरु केली आहे. सिरसाव ग्रामस्थांना स्वतंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात बस सुरु झाल्याने आनंद झाला असून ग्रामस्थांनी या बसचे तसेच चालक व वाहकाचे उत्साहात स्वागत केले.बससेवा सुरू करण्यासाठी गावातील तरूणाबरोबर ग्रामस्थांनी देखील खूप मेहनत घेतली होती तसेच धाराशिव एसटी महामंडळात कार्यरत असलेले अधिकारी कोळी साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.बस गावात दाखल झाल्यानंतर पुजारी नामदेव गुरव यांच्या हस्ते बसची पूजा करून चालक, वाहक यांचा महालक्ष्मीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गणेश चोबे, गजानन पाटील, पांडुरंग चोबे, पांडुरंग मिसाळ, अमोल पाटील, जोतीराम पाटील, विठ्ठल गावकरे, संतोष चोबे, राजाभाऊ मिसाळ, जिल्हा परिषद प्रशाला सिरसाव शाळेमधील सर्व विद्यार्थी व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


