स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
आळंदी:- संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर आळंदीतील ग्रामस्थांना विश्वस्त म्हणून डावल्याबद्दल दि.५ डिसेंबर रोजी आळंदी बंधाचे हाक समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांनी दिली होती. त्यांचे निवेदन दि.३ डिसेंबर रोजी आळंदी पोलीस स्टेशनला देण्यात आले होते. त्याच संबंधित विषयावर काम आळंदी पोलीस स्टेशन यांनी समस्त आळंदीकर ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. पोलीस प्रशासनाने आळंदी ग्रामस्थांचे मत जिल्हा न्यायाधीश यांच्यापर्यंत पोहोचलो असे त्यावेळी सांगितले होते. तसेच आळंदीकर ग्रामस्थांनी लोकशाहीच्या मार्गाने व शांततेत आळंदी बंद राहील व्यापारी वर्गाचा आम्हाला त्या संदर्भात पाठिंबा आहे. पोलीस प्रशासन आणि सांगितले तसेच विश्वस्त योगेश देसाई यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना आळंदीकर यांचे योगदान व देवस्थानाला मदत काय? असे वक्तव्य केले या वक्तव्याचा समस्त आळंदीकर ग्रामस्थांकडून निषेध होत आहे. तसेच त्यांनी ते वक्तव्य मागे घेऊन ग्रामस्थांची माफी मागावी अशी ही मागणी करण्यात आली. आज दि५ रोजी सकाळपासूनच आळंदी बांधाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंदिर परिसरातील व शहरातील विविध ठिकाणच्या विविध व्यापारी वर्गाने आपले दुकाने बंद ठेवली. विविध मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डी डी भोसले, पुरुषोत्तम महाराज पाटील, एडवोकेट स्मिता गुंडरे, गोविंद गोरे, संजय घुंडुरे, पाटील यांनी मनोगती व्यक्त केली. व विश्वस्त योगेश देसाई यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










