बार्शी तालुक्यासाठी ६ कोटी २० लाख रूपये किंमतीच्या १५५ विहीरी मंजूर — आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतक-यांसाठी महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२३-२४ अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर या योजनेतून ६ कोटी २० लाख रूपये किंमतीच्या १५५ विहीरी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी दिली.

अहिल्यादेवी सिंचन विहीर या योजनेचा लाभ तालुक्यातील गोरमाळे,उपळे दुमाला,तांबेवाडी,आगळगाव,घाणेगाव,तुर्कपिंपरी, कळंबवाडी आ,मुंगशी आर,मालवंडी,पुरी,उंबरगे,बाभुळगाव, बोरगाव खुर्द,पाथरी,उपळाई ठोंगे,मालेगाव आर,इंदापुर,साकत, गुळपोळी,सासुरे,श्रीपतपिंपरी,शेलगाव मा,मांडेगाव,खांडवी, पिंपळगाव धस,उंडेगाव,धोत्रे,ताडसौंदणे,पानगाव,देवगाव, आळजापुर,राळेरास,सर्जापुर,बाभुळगाव,तावडी,नारी,नारीवाडी, भातंबरे,ज्योतीबाचीवाडी,कांदलगाव,बावी आ,वांगरवाडी, तावरवाडी,जामगाव आ,पांगरी,निंबळक,कोरेगाव,खडकोणी, मळेगाव,धामणगाव दु,रातंजन,कोरफळे,मानेगाव,रुई,काटेगाव, अरणगाव,सारोळे,सुर्डी,बावी आ,चिखर्डे,रऊळगाव,वाणेवाडी
इत्यादी गावातील अल्पभूधारक शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे.

बार्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे,ग्रामविकास मंत्री गिरीशषजी महाजन,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आभार मानले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!