www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
(महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे केले प्रतिमा पूजन )
परंडा प्रतिनिधी दि . 26 नोव्हेंबर 2023 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा या महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली व अध्यक्षतेखाली भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला .भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी तथा संस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दिवाने वरिष्ठ लिपिक बाबासाहेब क्षीरसागर बबन ब्रह्मराक्षस दिपक ओव्हाळ उत्तम माने भागवत दडमल आदि कर्मचारी उपस्थित होते .
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.