थोर स्वातंत्र्यसेनानी टिपू सुलतान(र.अ.) जयंती निमित्त उडान फाउंडेशन च्या वतीने गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नात संसारपयोगी साहित्य भेट.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

भारत देशाचे थोर स्वातंत्र्यसेनानी हजरत टिपू सुलतान(र.अ.) यांच्या 273 व्या जयंती निमित्त उडान फाउंडेशन च्या वतीने गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नात संसारपयोगी भांडी भेट.

भारत देशावर 150 वर्ष राज्य केलेल्या इंग्रजविरुद्ध लढणाऱ्या व देशात मानवजातीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी शाहिद हजरत टिपू सुलतान र अ यांच्या जयंतीनिमित्त बार्शी शहरातील संघटना उडान फाउंडेशन यांच्या वतीने आदर्श उपक्रम राबविण्यात आला.महापुरुषांना डोक्यावर न्हवे तर डोक्यात घेणे महत्वाचे त्यांच्या उत्तम विचारांना आत्मसात करून त्यांच्या विचारांचा वारसा जपत विचार आत्मसात करत त्या विचारांचा समाजातील प्रत्येक कितपत फायदा होईल ह्या विचारातून कार्य करून खऱ्या अर्थाने हजरत टिपू सुलतान यांना अभिवादन करता येईल या मनिषेतून उडान फाउंडेशन यांच्या वतीने हा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला.मानवजातीच्या उद्धारासाठी विविध योजना राबविणाऱ्या महापुरुषांना सामाजिक कार्यातून अभिवादन करून महापुरुषांच्या विचारांना न्याय देण्याचा व सत्यात उतरवण्याचा प्रयत्न उडान फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आला.वायफळ खर्चाला फाटा देत गरीब कुटूंबाच्या मुलीच्या संसाराला हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया उडान फाउंडेशन च्या वतीने करण्यात आली.हा सामाजिक उपक्रम टिपू सुलतान ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष जाफर शेख,उडान फाउंडेशन चे अध्यक्ष इरफान शेख,जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण सचिव जमील खान,सल्लागार युन्नूस शेख,शब्बीर वस्ताद,समशेरखान पठाण,कार्याध्यक्ष शकील मुलाणी,मोहसीन पठाण,साजन शेख,आय्युब शेख,अमजद सय्यद,शोहेब काझी,सादिक सय्यद,रॉनी सय्यद,अकिल मुजावर,मुन्ना बागवान,तोसिफ बागवान,वाहेद शेख,ऍड,रियाज शेख,वसीम मुलाणी,अल्ताफ शेख,इकबाल शेख,शोहेब सय्यद,रियाज बागवान,मुज्जू बागवान इ.सदस्यांच्या मदतीने व मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!