श्रीरंग बारणे यांनी दिला कार्यकर्त्यांना शब्द ‘ शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही’.

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- दि. ८ नोव्हेंबर २०२३ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. दिवाळीपूर्वी नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप केले जात आहे. महिला बचत गटासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पक्षात आलेल्या प्रत्येकाला न्याय दिला जाईल कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. नव नियुक्त पद अधिकाऱ्यांनी सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे अहवान शिवसेना उपनेते खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. पिंपरी चिंचवड शहर शिवसेना व युवा सेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांची आढावा बैठक खासदार बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आकुर्डीत बुधवारी झालेल्या बैठकीत २५० जणांनी खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले १५० महिला सह विविध पदाधिकारी यांना पद वाटप करण्यात आले. जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, प्रमुख मावळ शरद कुलावले, शहर प्रमुख निलेश तरस, महिला जिल्हा संघटिका शैला पाचपुते, पिंपरी चिंचवडच्या शहर संघटिका सरिता अरुण साने, माजी नगरसेविका विमलताई जगताप, चिंचवड विधानसभा महिला संघटिका शारदा वाघमोडे, पिंपरी विधानसभा महिला संघटिका शैला निकम, युवा सेना पुणे जिल्हाध्यक्ष विश्वजीत बारणे, देऊ शहर प्रमुख सुनील हगवणे, आदी उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर राज्यातील जनतेचा कार्यकर्त्याच्या मोठा विश्वास आहे. त्यामुळेच विविध पक्षातील लोक शिवसेनेत येत आहेत. शहरात शिवसेनेची ताकद वाढत आहे. आमच्यावर विश्वास ठेवून कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत येत आहेत. पक्षात आलेल्या कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांना न्याय दिला जाईल असे श्रीरंग बारणे यावेळी म्हणाले.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!