स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
मा तहसीलदार परांडा यांना दिलेल्या निवेदनात
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. तसेच कमी पाऊस झाल्याने पशुपालक शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे, पशुखाद्याचे भाव वरचेवर वाढत चाललेले आहेत, पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न पशुपालकांसमोर आहे. तसेच जुलैमध्येच राज्य शासनाने दुधाचे दर 34 रुपयांवर निश्चित केले होते मात्र शासनाच्या या आदेशाला न जुमानता दुधाचे दर 28 रुपयावर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम दूध संघाने केले आहे तरी लवकरात लवकर दूध दर पूर्ववत करावे अन्यथा पशुपालक शेतकरी व छावा क्रांतिवीर सेना संघटने कडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असाल. असा इशारा देण्यात आला आहे.
सदरचे निवेदन माहितीस्तव
मा. दुग्धविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा. जिल्हाधिकारी, धाराशिव.
मा. पालकमंत्री, धाराशिव.
मा. पोलीस निरीक्षक, परंडा. यांना देण्यात आले.
निवेदनावर मराठवाडा संपर्कप्रमुख अमर भाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे, शेतकरी आघाडीचे नूतन जिल्हा उपाध्यक्ष राहुल बिभीषण गाढवे, तालुकाध्यक्ष सुधीर लटके लोणी सर्कल प्रमुख धनाजी ढोरे, सिताराम सातपुते, हरिभाऊ आदमिले, ज्योतीराम घोगरे, हनुमंत हावळे शरद कोपणार, बापूराव गोपने पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898




Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.