पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- दि ६ नोव्हेंबर मोशी ‘आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा लक्षवेधी उपक्रम’
गोवंश संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पिंपरी चिंचवड मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे अश्व व देशी गोवंश पशु प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पशु पालकांना रेकॉर्ड ब्रेक उपक्रम पाहता येणार आहे.ही संधी निर्माण झाली आहे. बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत यशस्वी लढा उभारणारे आणि संवर्धनासाठी चळवळ उभी करणारे गोरक्षक आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पुढाकाराने मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र येथे दिनांक २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भव्य देशी गोवंश प्रदर्शन व पशु आरोग्य शिबिर भरवण्यात येणार आहे. भारतातील सर्व जातीचे अश्व व गोवंश पशु प्रदर्शन तसेच आरोग्य शिबिरासह एकूण १७प्रकारातील पशूंचा रॅम्प वॉक असलेले हे देशातील पहिले देशी गोवंश पशु प्रदर्शन आहे. देवणी, किल्ला लाल, गंधारी, साहिवाल, लाल सिंधी, गीर, इंगोले, वेचुर, अशा विविध गोवंशरासाठी प्रजातीनिहाय स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढण्यात येणार आहेत. पहिल्या क्रमांकाच्या गोवंश आणि पशुचे रॅम वॉक होणार आहे. असा प्रयत्न भारतात प्रथमच होत आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
![](https://i0.wp.com/starmazanews.com/wp-content/uploads/2023/11/img-20231106-wa00532927269846023409744.jpg?resize=750%2C430&ssl=1)
![starmazanews](https://secure.gravatar.com/avatar/4fda7f8e27869db8a392615e0d2c6001?s=96&r=g&d=https://starmazanews.com/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.