स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
*मराठा आरक्षणाची धग तीव्र*
*बससेवा बंद ; परंडा बंदचे आवाहन*
*परंडा ६० गावात मंत्री आमदार खासदार यांना प्रवेश बंदी*
*११ गावात साखळी उपोषण तर ४ गावात अन्नत्याग*
*मोटारसायकल , ट्रॅक्टर , जेसीबी रॅली ; तहसिलदार यांना निवेदन*
*शहरातील मोदी सरकार सावंत यांचे डिजिटल फाडले ; बसवरील जाहिरातीला फासले काळे*
*परंडा :* मराठा आरक्षणाची धग तीव्रतेने वाढत असून परंडा तालुक्यातील ९६ गावांपैकी ६० गावांनी मंत्री , आमदार , खासदार यांना गाव बंदी केलेली आहे . अनेक गावात कँडल मार्च होत आहेत . ११ गावात साखळी उपोषण तर ४ गावात अन्नत्याग आंदोलन सुरु आहे .बससेवा बंद झाली असून प्रवाशांची गैरसोय झाली आहे . तर महारष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आल्याने परंडा बंदचे आवाहन मराठा बांधवांनी केले आहे .मोटारसायकल , ट्रॅक्टर , जेसीबी रॅली तसेच मोर्चा काढून घोषणा देत परंडा तहसिलदार यांना लोणी , घारगाव , वाकडी , लोणी , पाचपिपळा , कुंभेफळ , कपिलापुरी , साकत ( खु . ) आदी गावांनी सोमवार ( दि. ३० ) निवेदन दिले . तहसिल कार्यालय येथील मोदी सरकार तर चौकातील सावंत यांचे डिजिटल फाडले तसेच बसवरील महाराष्ट्र शासनाच्या जाहिरातीतील पंतप्रधान , मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला काळे फासले . सिरसाव,जवळा ,आसू ,दुधी ,डोण्जा ,बंगाळवाडी ,वाटेफळ ,शेळगाव ,आनाळा ,
आवारपिंपरी ,रोहकल या ११ गावांनी साखळी उपोषण सुरु केले आहे तर नालगाव ,आसू
सिरसाव ,कंडारी या ४ गावांनी अन्नत्याग केला आहे . ग्रामीण भागातून हजारो आंदोलक आले होते . परिसर विविध घोषणांनी व गर्दीने गजबजून गेलेला होता .
मराठा समाजाने असहकार आंदोलन करावे
भारत घोगरे गुरुजींचे आवाहन
परंडा : मराठा समाजाचे ५०%च्या आत कोर्टात टिकणारे ओ बी सी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे यासाठी दीर्घकाळ झाले सनदशीर मार्गाने वेगवेगळ्या प्रकाराचे आंदोलनाचे मार्ग अवलंबून सरकारच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे मनोज जरांगे यांनी या साठी सरकारला आवश्यक ती सूचना देऊन आमरण उपोषण केलेले आहे आज त्यांचे प्राण धोक्यात आलेले आहेत अनेक मराठा जणांनी टोकाचा आत्महत्येचा मार्ग अवलंबलेला आहे .तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार आडमुठे धोरण ठेवून प्रश्न चिघळत ठेवू पहात आहे मराठ्यांच्या जीवाशी सरकार खेळत आहे आता मराठ्यांची सहनशीलता संपत चालली आहे सरकारला हा प्रश्न मराठ्यांच्या मागणीनुसार सोडवण्यास भाग पाडण्यासाठी आता सकल मराठा समाजाने
आमदार, खासदार , मंत्री यांचेही असहकार पुकारावा जरी आपल्या नातेवाईकांपैकी हे असले तरी त्यांच्या कार्यक्रमाला जाऊ नये ,त्यांचे शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा , आपल्या कार्यक्रमास त्यांना सहभागी होऊ देवू नये , त्याचे सर्वप्रकारचे कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा सरकारी फतवे जुमानू नयेत सरकारला ईमेल करून हा प्रश्न सोडवण्यात भाग पाडावे ,असे भारत घोगरे गुरूजी यांनी म्हटले आहे .
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898




Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.








