कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने स्वराज्य प्रतिष्ठान व महाबली व्यायाम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २०० लिटर दूधाचे वाटत

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- दि.२८ ऑक्टोबर २०२३ चिखली धर्मराज नगर मध्ये सालाबादप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमा मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात आली.नवदिवस देवीची आरती सामाजिक कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या हस्ते आरती करण्यात आली. रोज दांडिया ( गरब्याचे) आयोजन मंडाळा तर्फे आयोजित करण्यात आले होते. देवची मिरवणूक पारंपारिक वाद्य (डॉल्बी) लावून काढण्यात आली होती.यामध्ये सर्व माता भगिनी मुल, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कोजागिरी पौर्णिमेला दांडियाचे आयोजन केले होते. यात चिखलीतील सर्व तरुण तरुणी, लहान मुले, महिला, यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वराज्य प्रतिष्ठान व महाबली व्यायाम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २०० लिटर दूध आनून ते आटवुन त्यामध्ये मशाले टाकून ते मशाले दूध बनवले होते. रात्री १२ वाजता दुधामध्ये पौर्णिमेचा चंद्र पाहुन सर्व जमलेल्या लोकांनी ते वाटप करण्यात आले. स्वराज्य प्रतिष्ठान व महाबली व्यायाम मंडळ यांच्या वतीने सर्व धर्मराज नगर मधील नागरिकांनचे आभार मानले. व दोन्ही मंडळाला केलेलं सहकार्याबद्दल मंडळे आपले सदैव आभारी आहोत.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!