पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- दि.२९ ऑक्टोबर २०२३भोसरी मराठा आरक्षणासाठी संपूर्ण शासन व्यवस्थेसमोर खडे टाकलेले मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून काढले आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभर साखळी उपोषण केले जात आहे. त्यातच एक भाग म्हणून भोसरी गाव येथे आज दिनांक २९ एक दिवशीय लक्षणीय उपोषण करण्यात आले. यावेळी माजी आमदार विलास लांडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी भोसरीत एक दिवशीय लक्षणीय उपोषण करण्यात आले. या ठिकाणी माजी आमदार विलास लांडे यांनी उपस्थित रहात सक्रिय सहभाग नोंदवला यावेळी विलास लांडे म्हणाले जरांगे पाटील नावाच्या माणसाने महाराष्ट्र हा हादरुन सोडला आहे. त्याच्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली सरकार मंत्रीमंडळ अस्वस्थ आहे. प्रत्येक मराठा करून मागील अनेक वर्षाचे खदखद रस्त्यावर घेऊन उतरत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनासमोर सरकारला गुडघे टेकावेच लागतील त्यानंतर आरक्षण ही मिळेल पण जरांगे पाटील यांनी मागील चार दिवसापासून अन्न पाणी वर्ज केल्याने माझ्यासारखा कार्यकर्ता अस्वस्थ आहे. जरांगे पाटील यांनी तब्येतीला जपून महाराष्ट्रातील तरुणांना दिशा द्यावी महाराष्ट्रातील मराठा बांधवांना विश्वास चेहरा कित्येक वर्षांनी सापडला आहे. अशा नेतृत्वाला आम्हाला गमवायचे नाही असे मत विलास लांडे यांनी व्यक्त केले आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.