मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्यांची ग्रामस्थांनी काढली तिरडी यात्रा.

Picture of starmazanews

starmazanews


कंडारी येथील मराठा बांधव आक्रमक.

चौथ्या दिवशी साखळी उपोषणात महिलांचा सक्रीय सहभाग .
स्टार माझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

दि २९ \१० \ २०२३
जसा जसा मराठा आरक्षणाचा विषय लांबत चालला आहे तसा तसा मराठा समाजात असंतोष पसरत चालल्याचे चित्र दिसत आहे आहे . गावो च्या गावे विविध पक्ष व नेत्यांना गावबंदी करण्यात आली असून मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे . परंडा तालुक्यात ठिकाणी साखळी उपोषण सुरू असून मराठा समाज जागृत झाल्याने साखळी उपोषणास मोठा पाठिंबा मिळत आहे . मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आशेने पाहत आहे .परंतु सरकार मात्र मराठा आरक्षणाविषयी गंभीर दिसत नसल्याने मराठा समाजातील सहनशीलता संपत असल्याचे चित्र आहे .
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत मौ कंडारी ता परंडा येथे साखळी उपोषण गेली चार दिवसापासून सुरू आहे .या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काल गावातील महिला व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला .

जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून महिलांनी गावात फेरी काढून महिलांना उपोषणासाठी उपस्थित रहाण्यासाठी आवाहन केले .
यावेळी जय भवानी जय शिवराय .
आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाच , करेंगे या मरेंगे हम सब मनोज जरांगे अशा घोषणांनी परीसर दणाणला .

राज्यकर्त्यांनी लवकारात लवकर निर्णय घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यावे अन्यथा जिजाऊंच्या लेकी पदर खोचून बाहेर पडतील तेव्हा तुम्हाला लपायला जागा उरणार नाही हे लक्षात ठेवावे असा इशारा देण्यात आला. जिजाऊंच्या लेकींच्या ताकदीचा अंदाज आपणांस नाही असे दिसते परंतु महिलांच्या ताकदीला नजर अंदाज करण्याची चुक आपणास महागात पडू शकते. राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई, अहिल्यादेवी, फातिमाबी, माता रमाई या इतिहासाला नोंद घ्यायला लावणाऱ्या महिलाच होत्या लक्षात ठेवा. आम्ही रस्त्यावर उतरणे आपणांस परवडणारे नाही याची जाणीव राज्यकर्त्यांना असावी. सध्या फक्त आमचे बांधव रस्त्यावर उतरले आहेत तर आपली भंबेरी उडाली आहे त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर ते महागात पडेल अजा इशारा महिलांनी दिला.

आजच्या या साखळी उपोषणात जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष शिवमती आशाताई मोरजकर व त्यांचे सहकारी यांनी पाठींबा देऊन उपोषणात सहभागी झाल्या होत्या .

मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार कंडारी येथील साखळी उपोषणाचे आमरण उपोषणात रुपांतर झाले असून काल गावातील २५ बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत .


मराठा आरक्षणा बाबत निर्णय घेण्यास वेळकाढू पणा सरकार करत आहे . राज्य सरकार व मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यां विरोधात मराठा समाजात प्रचंड रोष आहे.
विरोध करणाऱ्या या नेत्यांची अंदोलकांनी काल रात्री प्रेतयात्रा काढून गावातून मिरवणूक काढली . गावातील छ शिवाजी महाराज चौकात सरण रचून प्रतिकात्मक पुतळ्याला अग्नी देण्यात आला . यावेळी मुंडण करून मराठा बांधवांनी निषेध केला .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!