www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी शहर पोलीस ठाणे गुरनं. ९२०/२०२३ भा. द. वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे दाखल. गुन्हयातील फिर्यादी नामे सुनिल गोरख चव्हाण वय- ३६ वर्षे, धंदा- शेती, रा. चिखर्डे ता. बार्शी हे दिनांक १२/१०/२०२३ रोजी मध्यरात्री गावाकडे जाण्यासाठी बस नसल्याकारणाने बस स्टॅण्ड येथे झोपले असता त्यांनी दोन अज्ञात इसमांनी झटापट करुन मारहाण करुन त्याचे खिशातील १३,०००/- रुपये किंमतीचा एक विवो कंपनीचा वाय- १६ मॉडेलचा मोबाईल बळजबरीने हिसकावुन घेवुन गेले होते. त्याप्रमाणे बार्शी शहर पोलीस ठाणे गुरनं. १२०/२०२३ भा. द. वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे करण्यात आला होता त्याचा तपास पोसई/ महेश गळगटे हे करीत आहेत.
मा. पोलीस निरीक्षक यांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणणे साठी त्यानुसार आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाची तात्काळ दखल घेवून गोपनिय माहीतीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यापासुन दोन तासांचे आत दोन संशयीत इसम नामे १) सुरज विजय कांबळे वय- २७ वर्षे, रा. पाटील चाळ, तुळजापुर रोड बार्शी, २) शाहरुख ईनुस शेख वय- २४ वर्षे, रा. भवानी पेठ, सोलापुर रोड बार्शी यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा कबुल केल्यावरुन गुन्हयातील गेला माल १३,०००/- रुपये किंमतीचा एक विवो कंपनीचा वाय- १६ मॉडेलचा मोबाईल त्याचेकडुन जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयात दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे. सदरचा गंभीर जबरी चोरीचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक सो, सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो, सोलापुर ग्रामीण, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी जालींधर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक मा. संतोष गिरीगोसावी, सपोनि/ दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे व डी. बी. पथक यांनी केली आहे.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.